
प्रसिद्ध भजनकार जया किशोरी यांनी तरडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले असून आळंदी देवस्थानतर्फे त्यांचा सन्मान केला.
स्थैर्य, तरडगाव, दि. १७ जुलै : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तरडगाव येथे मुक्कामी असताना प्रसिद्ध भजनकार आणि सोशल मीडिया स्टार जया किशोरी यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने रोहिणी पवार यांनी जया किशोरी यांचा यथोचित सन्मान केला.
या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये तरडगाव मुक्कामी अनेक दिग्गजांनी हजेरी लावून माऊलींचे दर्शन घेतले आहे.
यामध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विधानसभा व विधान परिषदेतील विविध आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी वारीमध्ये सामील होऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
तरडगाव येथील पालखी मुक्कामादरम्यान वारकऱ्यांमध्ये आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
