दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक, फलटण येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण तालुक्यामधील ओबीसी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी बांधवांच्या एकीची वज्रमूठ व ऐक्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती, फलटण यांनी केले आहे.