२६ नोव्हेंबरनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
२६/११ म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले पोलीस बांधव आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून एक जीव सेवा संघ बारामती, सायकल क्लब, साहस अ‍ॅडवेंचर यांच्या माध्यमातून रविवार, २६ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन इन्व्हरमेंटल फोरमच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विनय बाबुराव कणसे (पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षण केंद्र नानवीज, दौंड, पुणे), सुरेश खोपडे (सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य) आणि भारत फोर्ज बारामती विभागाचे अध्यक्ष संजय अग्रवाल व बारामती सायकल क्लबचे श्रीनिवास वाईकर, उद्योजक सुधीर शिंदे, आभाळ माया ग्रुप, दुर्गवेडे बारामतीकर ग्रुप, ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ग्रुप, ड्रीम डान्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी या ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत संजय अग्रवाल अध्यक्ष, भारत फोर्ज बारामती यांनी केले. प्रास्ताविक श्री बसवेश्वर भैसे यांनी केले. आभार श्री. अविनाश भोसले यांनी मानले. तर सूत्रसंचालनाचे काम महेश जाधव यांनी केले.

या शिबिरात एकूण १०७ रतदात्यांनी रक्तदान केले.


Back to top button
Don`t copy text!