पुण्यात पुन्हा शिरला गवा; बावधन परिसरात उडाली खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पुणे, दि.२२: बावधान परिसरात आज सकाळी पुन्हा रानगवा दिसला आहे. दोन आठवड्यांपुर्वी कोथरुड परिसरात मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान नागरिकांनी हायवे आणि बावधन परिसरात गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली आहे असून गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

बावधन येथील एचसीएमआरएल पाषाण तलावालगत असलेल्या भिंती जवळ पुन्हा एकदा गवा आढळून आला आहे. या परिसरात झाड झुडपांची गर्दी असून मानवी वस्ती नाही. दरम्यान, दोन आठवड्यांपुर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला पुण्यातील कोथरूड पसिरातील रानगवा शिरला होता. त्यावेळी लोकांचा अतिउत्साह आणि गर्दी पाहून बिथरलेला गवा मुख्य रस्त्यावर धावत होता. त्यानंतर वनविभागाने गव्याला ३ डार्ट मारून गव्याला बेशुध्द करण्याचा प्रयत्न करत गव्याला ताब्यात घेतले होते. अखेर त्या गव्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मागच्यावेळी झालेला प्रकार पुन्हा घडू नये यासाठी यावेळी प्रयत्न केले जात आहे. 

दरम्यान, वनविभागाची टिम घटनास्थळी पोहचली असून रानगव्याला पकडण्यासाठी नियोजन करत आहे. मागच्या वेळी झालेला हलगर्जीपणा पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

खडकवसाला दक्षिण घाटाच्या दिशेने, उसाच्या शेतात शिरलेले वाट चुकलेले गवे मानवी वस्तीत शिरत आहेत.दरम्यान, बावधान परिसरात संचारबंदी घालून गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा सुर उमटत आहे पण प्रत्यक्षात अशी कितपत शक्य आहे याबाबत फेरविचार केला जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!