देशी दारुसह चारचाकी गाडी जप्त


 

स्थैर्य, सातारा, दि.२४:  तालुक्यातील लिंब ते शिवथर रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी दोघांवर  गुन्हा दाखल केला असून त्यांना प्रतिंबधात्मक नोटीस बजावली आहे. अमोल अ हिरेकर, मौला शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी  दिलेली माहिती अशी, लिंब ते शिवथर रस्त्यावर एके ठिकाणी सातारा तालुका पो लिसांना 7 हजार 448 रुपयांच्या 144 सीलबंद बाटल्या, चार हजार रुपयांची रोक ड, पंधरा हजार रुपयांचा मोबाईल आणि पाच लाख रुपयांची सुमो असा 5 लाख  26 हजार 448 रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी अमोल प्रकाश  अहिरेकर (वय 33), मौला शेख (वय 31, दोघे रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव,  जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!