सस्तेवाडी: बांधकाम कामगारांसाठी मोफत अत्यावश्यक व सेफ्टी किट नोंदणी शिबीर उत्साहात संपन्न


माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सस्तेवाडीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत किट नोंदणी शिबीर पार पडले. लवकरच एका मोठ्या कार्यक्रमात याचे वाटप होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 17 मे : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे सरचिटणीस अक्षय सस्ते यांच्या सहयोगाने, सस्तेवाडी पंचक्रोशीतील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत ‘अत्यावश्यक किट’ आणि ‘सेफ्टी किट’ वाटपाच्या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सस्तेवाडी येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिराला कामगारांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांची उपस्थिती:

या नोंदणी शिबिराप्रसंगी खुंटे गावचे माजी सरपंच विलास काळे, कृषी सहाय्यक वैशाली कर्चे, भाजप नेते मल्हारी अवघडे, गणेश गरुड, किरण सस्ते, यशोदीप सस्ते, विक्रम भोसले, दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ पाटोळे, दत्तात्रय आवटे यांच्यासह परिसरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लवकरच रणजितदादांच्या हस्ते होणार प्रत्यक्ष वाटप:

याप्रसंगी बोलताना भाजप सरचिटणीस अक्षय सस्ते यांनी पुढील नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, “याआधीही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही सस्तेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोफत भांडी वाटप केले होते. आता या शिबिरात नोंदणी झालेल्या सर्व बांधकाम कामगारांना या दोन्ही संचांचे (अत्यावश्यक किट आणि सेफ्टी किट) प्रत्यक्ष वाटप लवकरच एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून, रणजितदादांच्या हस्ते करण्यात येणार आहे.”

या उपक्रमामुळे गरजू आणि कष्टकरी बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून, कामगारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!