सातार्‍यात जुगार अड्ड्यांवर छापे


 

स्थैर्य, सातारा, दि.२४: शहर व परिसरात पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर कारवाईचा धडाका सुरू के ला असून तिघांवर सातारा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवार परज  आणि गोडोली परिसरात पोलिसांनी हे छापे टाकले आहेत. गुरुवार परजावर  असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली पत्र्याच्या शेडच्या आडोशाला रोहन बाबासाहेब  कांबळे (वय 23, रा. शनिवार पेठ, सातारा) हा जुगार अड्डा चालवत असताना  निदर्शनास आला. त्याच्याकडून पोलिसांनी 1650 रुपयांची रोकड आणि जुगाराचे  साहित्य जप्त केले. पोलिसांनी रोहन कांबळे याला प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस  बजावली आहे. सातारा शहर पोलिसांनी दुसरी कारवाई साईबाबा मंदिराजवळील क मानी हौदाशेजारील श्री सेवा अपार्टमेंट, गोडोली येथे एका पत्र्याच्या शेडच्या  आडोशाला सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर केली. या कारवाईत पोलिसांनी  शाहीद शब्बीर सय्यद (वय 22, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) आणि सनी धनाजी  भिसे (रा. बुधवार पेठ, ता. जि. सातारा) या दोघांवर गुन्ह दाखल केला असून  त्यांच्याकडून 590 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!