कोरोना लसीची नोंदणीसाठी ग्रामपंचायतीत संपर्क साधा : संजय कामठे


स्थैर्य, कोळकी, दि. ०३ : कोळकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर एप्रिल महिन्याच्या प्रत्येक बुधवारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोळकी मधील जास्तीत जास्त नागरिकांनी आपली नोंदणी करून कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. परंतु ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे व नोंदणी करण्यामध्ये अडचणी येत आहेत, अश्या सर्व नागरिकांसाठी कोळकी ग्रामपंचायतीमध्ये कोरोना लस घेण्यासाठीची नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी कोळकी ग्रामपंचातीमध्ये सौ. रोहिणी उमेश कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोळकी ग्रामपंचातीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!