
दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतीय रिझर्व बँक, मुंबई यांनी कळविलेनुसार त्यांच्या आस्थापनेवरील भारतीय रिझर्व बँक, मुंबई मध्ये वाहन चालकांची (वर्ग-04) पदे भरावयाची आहेत. तरी सातारा जिल्हयातील इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नांव नोंदणी 16 एप्रिल 2023 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.rbi.org.in हे संकेतस्थळ पहावे व अर्ज ऑनलाईन ॲल्पिकेशन फॉम ह्या लिंकवरती क्लिक करुन भरावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.