सेंट्रल वॉटर कमिशनचे चेअरमन कुशवेंद्र ओहरा यांची खासदार रणजितसिंह यांनी घेतली भेट; निरा-देवघरच्या निधीबाबत केली चर्चा


दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२३ | फलटण |
दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सेंट्रल वॉटर कमिशनचे चेअरमन कुशवेंद्र ओहरा यांची भेट घेतली व निरा-देवघर धरणाच्या निधीबाबत चर्चा केली. लवकरच केंद्र शासनाकडून धरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती कुशवेंद्र ओहरा यांनी यावेळी दिली.

यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या ५५ दुष्काळी तालुक्यांच्या नदीजोड प्रकल्प तसेच दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना खासदार निंबाळकर यांनी दिल्या. या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याबाबत जलसंपदा सदस्यांची बैठक ज्या राज्यामध्ये चांगलं काम सुरू आहे, अशा राज्यांमध्ये अभ्यास दौरा करून जलसंपदा सदस्य व संबंधित अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून या प्रश्नावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीमधून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी याचा वापर दुष्काळी भागाला कसा करता येईल, ही माहिती खासदारांनी दिल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही दुष्काळी तालुके या भागामध्ये पाणी कशा पद्धतीने नेता येईल, यावर केंद्र शासनाने लवकरच समिती गठीत करावी, अशा सूचना खासदार निंबाळकर यांनी केल्या व अभ्यासपूर्ण अहवाल तयार करावा, असे म्हटले आहे.

यावेळी निरा-देवघर धरणाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत सेंट्रल वॉटर कमिशनचे चेअरमन कुशवेंद्र ओहरा यांचे खासदार निंबाळकर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!