शाळा बंद असली तरी “शिक्षण मिळेल घरोघरी” ने वाचू लागली मुले


 

स्थैर्य, फलटण, दि. १६ : कोरोना या महामारीमुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले होते. यावर उपाय म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे ठरवले. त्यानुसार अनेक शिक्षकांनी सुरुवातही केली. परंतु लहान वयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा येत होत्या, विशेष करून पहिलीचा नवख्या विद्याथ्यांची फारच अडचण येत होती. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथील उपक्रमशील शिक्षक संजय खरात यांनी एक आगळावेगळा उपक्रम सूर केला. 

“शाळा बंद असली तरी, शिक्षण मिळेल घरोघरी” या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची गंगा पोहोचवली. यात प्रत्येक विद्यार्थी केंद्रभूत मानून स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यासह इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या घरी जवळपास 1200 भेटी  दिल्या. त्यासाठी त्यांनी विद्यार्थी निहाय व घटकनिहाय स्वतः नियोजन करून प्रत्येक घटकासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच दिला.  विविध शैक्षणिक शैक्षणिक साहित्याद्वारे  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पालकांच्या सहकार्यातून कृतीयुक्त शिक्षणाचा सराव दिला. त्यामुळे अक्षर ओळख ते उतारा वाचन पर्यंतचे सर्व टप्पे विद्यार्थ्यांनी पार केले आहेत.कोरोना काळात पाहिलीतली मुले कशी शिकणार हा प्रश्न भेडसावल्याने हा उपक्रम राबविला असल्याचे खरात गुरुजी यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!