स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय वंशाच्या डॉ. स्वाती मोहन यांच्यामुळे झाली नासाच्या ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ची यशस्वी लँडिंग

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 19, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य,दि.१९:  अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी एका रोव्हरला पाठवले आहे. ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ची यशस्वी लँडिंग ही भारतीय वेळेनुसार रात्री दोन वाजता करण्यात आली. या लँडिंगचे संपूर्ण श्रेय एका भारतीय वंशांच्या महिल्या शास्त्रज्ञाला जाते. या संपूर्ण मिशनला 203 दिवस लागले असून या सहा पायांच्या रोबोटने सात महिन्यात 47 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन मंगळ गाठले. या संपूर्ण मिशनमधील सर्वात कठीण आणि धोकादायक क्षण तो होता रोव्हर मंगळावरील सर्वात अवघड जजिरो क्रेटरवर उतरण्याचा. शेवटच्या सात मिनटात रोव्हराचा वेग हा शुन्यावर आणत सुरक्षित लँडिंग करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी यशस्वीरित्या पेलली.

सर्वात मोठी जबाबदारी स्वातीवर होती

‘दि सांयस’ने सांगितल्यानुसार, मंगळ ग्रहाजवळ पोहचणे सोपे असून सर्वात कठीण काम रोव्हरच्या लँडिंगचे होते. कारण, बहुतेक रोव्हर या स्टेजला येऊन बंद पडतात. ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ने शेवटच्या 7 मिनटात 12 हजार मैल प्रति तासावरून शुन्यावर येत यशस्वीरित्या लँडिंग केली. या उंचीवर, रोव्हरच्या वेगाला शुन्यावर आणत नंतर परत त्याला लँड करणे हे काही चत्मकारापेक्षा कमी नव्हते. परंतु, डॉक्टर स्वाती मोहन आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्यापुर्ण केली.

‘टचडाउन कन्फर्म्ड’

स्वाती या इंजीनियर आहेत. ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ने लँडिंग करताच याच्या हॅलिकॉप्टरने पंख उघडले. हे रोव्हर लँड होताच स्वाती आणि त्यांच्या टीमच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांना दिसत होता. यानंतर संपूर्ण जगाला एक मेसेज मिळाला ‘Touchdown confirmed’ म्हणजेच लँडिंग यशस्वी झाली. हे ऐकण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक होते.

कोण आहेत डॉक्टर स्वाती मोहन ?

स्वाती या मुळ भारतीय असून एका वर्षांच्या असताना त्यांचे आई-वडील अमेरिकेला स्थंलातरित झाले होते. यानंतर स्वाती नॉदर्न वर्जिनियात लहानाच्या मोठ्या झाल्या. 9 वर्षांच्या असताना स्वाती यांनी पहिल्यांदाच ‘स्टार ट्रेक’ सीरीज पाहिली आणि अंतराळात काहीतरी शोधण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वाती यांनी इंजिनियरिंग आणि स्पेस एक्सप्लोरेशेनमध्ये करियर बनविण्याचे ठरवले. कॉर्नेल विद्यापीठात मॅकेनिकल आणि ऐरोस्पेसमध्ये इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी आपली पीएसडी पूर्ण केली.

नासाचा अनेक वर्षांचा अनुभव

नासाच्या मिशन मंगळ आणि विशेषतः पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत स्वाती आधीपासूनच जोडल्या गेल्या आहेत. पासाडेनामध्ये नासाच्या जेट प्रॉपल्शन युनिटमध्ये त्यांनी अनेक दिवस काम केले आहे. दरम्यान, काही स्पेस मिशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर रिसर्च करत असताना त्यांनी शनी म्हणजेच सॅटर्न संबंधित मिशनमध्येही चांगली जबाबदारी केली आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

दिशा रवीला 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्ट म्हणाले- लोकांना बोलण्याचा अधिकार, पण देशाची अखंडता महत्वाची

Next Post

अशोक सिंघल यांचे भाऊ अरविंद सिंघल यांनी राम मंदिरासाठी दिले 11 कोटी रुपये

Next Post

अशोक सिंघल यांचे भाऊ अरविंद सिंघल यांनी राम मंदिरासाठी दिले 11 कोटी रुपये

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.