दिशा रवीला 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्ट म्हणाले- लोकांना बोलण्याचा अधिकार, पण देशाची अखंडता महत्वाची


स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१९: दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने टूलकिट प्रकरणात अटक झालेल्या क्लायमेट अॅक्टिविस्ट दिशा रवीला 3 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिशाला कोर्टात हजर केले होते. पोलिसांनी कोर्टाकडे अजून तीन दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. दरम्यान, दिशाने जामीनासाठी अर्ज केला होता, याव शनिवारी सुनावणी होईल.

यापूर्वी दिशाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान कोर्ट म्हणाले की, लोकांचे खासगी अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच आणि देशाच्या अखंडतेमध्ये बॅलेंस असायला हवे. जस्टिस प्रतिभा एम सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘यात कोणतेच दुमत नाही की, रेगुलेशन ऑफ कंटेंट संपू्र्ण जगासाठी एक वादग्रस्त मुद्दा आहे. भारतही यापासून वाचू शकला नाही.’

दिशाकडून दाखल चाचिकेत मागणी करण्यात आली होती की, दिल्ली पोलिसांना निर्देश देऊन या प्रकरणासी संबंधित माहिती लिक न करण्याची आदेश द्यावेत. परंतू, पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्टाने 17 मार्चला पुढील तारीख दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!