विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडून फलटण आगाराचा सन्मान


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात फलटण आगाराने पुणे प्रदेशात ‘अ’ वर्ग बसस्थानकातील ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ म्हणून प्रथम क्रमांक मिळवून रुपये १० लाखांचे बक्षीस मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सातारा विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी फलटण आगारास भेट देऊन फलटण आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

यावेळी पलंगे यांनी या अभियानात यश मिळविण्यात यशस्वी ठरलेले तत्कालीन प्रभारी आगार व्यवस्थापक श्री. रोहित नाईक व नूतन आगार व्यवस्थापिका श्रीमती सोफिया मुल्ला यांच्यासह आगाराच्या सर्व कर्मचार्‍यांना शुभेच्छा देऊन अशाच प्रकारे फलटण आगाराची यशस्वी वाटचालीची परंपरा कायम राखावी, असे आवाहन केले. फलटण आगार उत्पन्नामध्ये पण नेहमीच आघाडीवर असल्याचे प्रतिपादन पलंगे यांनी केले.

यावेळी आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रोहित नाईक, स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज आहिवळे, वरिष्ठ लिपिक कुलदीप चव्हाण, लहू चोरमले व बहुसंख्य चालक वाहक, कार्यशाळा, प्रशासकीय व पर्यवेक्षकिय कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!