महाराष्ट्र सायकल क्लबद्वारे ६ जुलैला फलटण-पंढरपूर सायकल वारीचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र सायकल क्लब फलटणद्वारे शनिवार, ६ जुलै रोजी फलटण-पंढरपूर सायकलवारी जात आहे, याचे ‘फ्लग ऑफ’ करण्यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायकल क्लब फलटणचे अध्यक्ष राम मुळीक यांनी दिली.

फलटण सायकल असोसिएशन व फलटणमधील इतर सायकल मित्र यांनी सायकल वारीत जास्तीत जास्त सहभागी होऊन महाराष्ट्र सायकल क्लबचा गौरव वाढवावा, असे आवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!