दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | फलटण |
देशाच्या पूर्वोत्तर राज्यांसाठी सात खंडपीठे असतील तर महाराष्ट्रात सातार्यासह चार हायकोर्टाची खंडपीठे का असू शकत नाहीत. तसेच जर एका राज्यात १ ते ७ पर्यंत हायकोर्टाची खंडपीठे तयार होऊ शकतात तर भारतात सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ सोलापूर किंवा कोल्हापूरमध्ये का तयार होऊ शकत नाही, असा सवाल सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचनकन्होजा खरात यांनी प्रशासनाला विचारला आहे.
राज्यात हायकोर्टाची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांना न्याय मागण्यात अडचणी येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात हायकोर्टाचे खंडपीठ नसल्याने १०० ते ६०० कि.मी. लांब न्याय मागण्यासाठी कसे जायचे, असे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी सातारा जिल्हा येत असल्याने येथे हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करावे व सोलापूर किंवा कोल्हापूर येथे सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ तयार करावे, अशी मागणी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे कु. कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे.