
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 5 : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, दि. 23 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी करून लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणास न सांगण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
