पुण्यातून येऊन लॉजवर राहिलेल्या 15 जणांवर गुन्हा


स्थैर्य, पुणे, दि. 20 : पुणे ते पारगाव असे बेकायदेशीर प्रवास करून विनापरवाना पुणे _सातारा जिल्ह्यात सीमेवरील हॉटेल राजावत येथे पंधरा जणांनी वास्तव्य केले .याची माहिती गाव समितीला न देता लपवून ठेवल्याप्रकरणी या सर्वांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव खंडाळा हद्दीत हॉटेल राजावत येथील लॉजमध्ये विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणारे पंधरा जण राहत होते .जिल्हा बंदीचा आदेश असतानाही हे सातारा जिल्ह्यात येऊन लॉज मध्ये वास्तव्य करत होते. याची माहिती ग्रामस्तरीय समितीला समजल्यावर  समितीच्या सदस्यांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता तपास रंजन पटनायक, मोहित सुरेश गुप्ता ,चन्द्रभूषण लक्ष्मण कुमार,चंद्रप्रकाश नंद्वाना, पंकज  सिंह रावत ,संदीप सुखविर सिंह बब्बर ,विपिन उदय विरसिंह कुमार ,राजेंद्र ओम बहादुर ,तेजस्वी राकेश जगताप ,दीपक राजपाल सिंग चौधरी, प्रवीण महेंद्र चंदेल ,सुमन संसार ,चंदन आग ,आकाश चंद्रपाल त्यागी, निखिल दीपक वळूंज हे सर्व रा. पुणे व सनित सुधीर गांधी रा. महाड जिल्हा रायगड हे पुण्यातून तीन बस मधून घेऊन लॉजवर राहत होते.

या प्रकरणी गाव कामगार तलाठी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा बंदीचे आदेश असल्यामुळे खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे चेक नाका उभारण्यात आला आहे .चेक नाक्यावर पोलिसांची पथके आहेत त्या ठिकाणी नागरिकांची तपासणी करून कॉरंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. अशा वेळी तीन-तीन बस मधून 15 लोक येतातच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!