फलटण नगर परिषदेमध्ये कोरोनाची एन्ट्री


स्थैर्य, फलटण : फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या एका मुकदमाचा कोरोना चाचणी मधला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटण नगर परिषदेमध्ये कोरोनाची एन्ट्री झालेली आहे. फलटण नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या मुकादमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून फलटण नगरपरिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या व त्यासोबतच अत्यावश्यक सेवेत म्हणजेच महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व हॉस्पिटल प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांची स्क्रीनिंग करून संशयितांचा कोरोनासाठीचा स्वँब घेतला जाणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

फलटण नगरपरिषदेच्या हद्दीमधील अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांचे स्क्रिनिंग आगामी काळामध्ये केले जाणार असून स्क्रीनिंग मध्ये ज्या व्यक्तींचे कोरोना बाबतचे सिम्प्टम्स जाणवतील अशांची त्वरित अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. फलटण नगरपरिषद हद्दीमध्ये जे कोणी भाजीपाला विक्रेते आहेत, जे कोणी हातगाडीवाले आहेत किंवा ज्यांचा नागरिकांची सततचा संपर्क येतो अशा सर्वांचे स्क्रीनिंग फलटण नगर परिषदेमार्फत केले जाणार आहे. स्क्रीनिंग केलेल्यांमध्ये ज्यांचे कोरोना बाबतचे सिम्प्टम्स जाणवतील अशांचे अँटीजन टेस्ट मार्फत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, असेही मुख्याधिकारी काटकर यांनी स्पष्ट केले.

फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे कोणी नागरिक वास्तव्यास आहेत व त्यांना सर्दी, ताप, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार जाणवत आहेत. त्यांनी त्वरित फलटण नगर परिषदेशी संपर्क साधून आपली कोरोना बाबतची चाचणी त्वरित करून घ्यावी, अशाने आपल्याला कोरोना या आजाराला बरोबर लढता येईल व जर साखळी असेल किंवा नव्याने साखळी तयार होत असेल तर अशांची कोरोनाची साखळी ब्रेक करता येईल. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार असलेल्या नागरिकांनी त्वरित फलटण नगरपरिषदेशी किंवा फलटण नगरपरिषदेच्या शंकर मार्केट येथील बाहुली शाळेमध्ये येथील हॉस्पिटल मध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी असेही मुख्याधिकारी काटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!