स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव

स्थैर्य, नवी दिल्ली, 23 : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

सामुदायिक रेडिओ म्हणजे ‘परिवर्तनाचे पाईक’ आहेत असे जावडेकर म्हणाले. या केंद्रांपर्यंत संपर्क अभियानांतर्गत पोहोचण्याच्या एक विशेष भाग म्हणून जवळपास 300 सामुदायिक रेडिओ केंद्रांना संबोधित करताना ते बोलत होते. सरकार लवकरच अशा स्थानकांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन येईल असे त्यांनी सांगितले.

कम्युनिटी रेडिओ केंद्रे स्वयं-शाश्वत व्हावीत म्हणून त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी सरकार उत्सुक आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे. सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळविण्याची गरज भासू नये.

जावडेकर म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75% खर्च मंत्रालयाकडून केला जातो जो निश्चित खर्चाचा मोठा हिस्सा असतो. जाहिरात प्रसारणाच्या वेळेत बदल केल्यामुळे कम्युनिटी रेडिओ केंद्रांना त्यांच्या परिचालन खर्चात मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

कम्युनिटी रेडिओला सहकार्य करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय  “भारतातील कम्युनिटी रेडिओ चळवळीला समर्थन” नावाची योजना राबवित असून त्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओच्या केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी भाष्य केले. एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले.

बनावट बातम्यांचा धोका ओळखून बातम्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी असे आग्रही प्रतिपादन जावडेकर यांनी  केले. त्या बातम्या ऑल इंडिया रेडिओलाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल असा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले की, मंत्रालयाने पत्र सूचना कार्यालयांतर्गत एक सत्यासत्यता पडताळणी विभाग अर्थात फॅक्ट चेक सेल तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ हे या फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात.

भारतातील कम्युनिटी रेडिओ केंद्र

भारतात 290 कम्युनिटी रेडिओ केंद्र असून त्यातील 130 शैक्षणिक संस्थांद्वारे,143 सामाजिक संस्थांद्वारे तर 17 कृषी विज्ञान केंद्रांद्वारे चालविली जातात. ही कमी शक्तीची एफएम रेडिओ केंद्र असून  10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे प्रसारण ऐकता येते. तळागाळातील लोकांसाठीच्या संप्रेषणात बर्‍याचदा या केंद्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.


Tags: आंतरराष्ट्रीय
ADVERTISEMENT
Previous Post

‘तो’ कोरोना बाधीत नाही: प्रसाद काटकर

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

फलटण – लोणंद रोडवर अपघात; दोघे जखमी

March 5, 2021

आई-वडिल मारतील म्हणून घरात चोरी झाल्याचा बनाव, अकरा वर्षाच्या मुलाचा प्रताप

March 5, 2021

कोल्हापूर, बारामतीतील उद्योजकांवर हनी ट्रॅप

March 5, 2021

पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

March 5, 2021

हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा

March 5, 2021

ग्रेड सेप्रेटरमध्ये स्टंटबाजी अंगाशी आलीदुचाकीस्वार युवकावर गुन्हा दाखल 

March 5, 2021

परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा 

March 5, 2021

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा 

March 5, 2021

गोडोली येथून दुचाकी चोरीस

March 5, 2021

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.