साखरेचा दर ७२ वरून थेट ६० रुपयांवर! गुळाचे भावही उतरले

दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२६ | पुणे |
केंद्र सरकारने कारखान्यांकडून साखर खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. तसेच, नोंदणीकृत व्यापार्‍यांनाच साखर विक्री करण्याचे बंधन कारखान्यांवर घातले आहे. या निर्णयामुळे साखर बाजारावर नियंत्रण आले असून, दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात किलोमागे ७२ रुपयांपर्यंत पोहोचलेला साखरेचा दर शनिवारी ६० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

साखरेच्या दरातील घसरणीचा परिणाम गुळावरही झाला असून, गुळाच्या भावात किलोमागे सात ते आठ रुपयांची घट झाली आहे. आगामी कृष्णजन्माष्टमी आणि गणेशोत्सवामुळे गुळाला मागणी वाढण्याची शक्यता असून, सध्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला. बाजारात स्पॅनिश शेंगदाण्याच्या नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. महिनाभरात गुजरातमधूनही नवीन शेंगदाण्याची आवक सुरू होईल. श्रावणामुळे शेंगदाण्यासह साबुदाणा, भगर आणि नारळाला चांगली मागणी असल्याने त्यांचे दर तेजीत आहेत. आटा, रवा, मैदा आणि बेसनाच्या भावातही वाढ झाली आहे. आवक कमी पडल्याने पांढर्‍या वाटाण्याच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली. रिमझिम पावसामुळे मिरचीचा बाजार मात्र थंडावला असून, उर्वरित अन्नधान्यांचे दर स्थिर आहेत.

साखर (प्रतिक्विंटल) ५५००-६००० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) : – शेंगदाणा तेल २६५०-२९५०, रिफाईंड तेल २५००-३२००, सरकी तेल २५५०-२९५०, सोयाबीन तेल २२००-२५००, पामतेल २१००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २४००-२६५०, खोबरेल तेल ४२००, वनस्पती २२००-२६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४४००-४६००, मसुरी ३३००-३४५०, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७०००, लचकारी कोलम ७०००-७५००, चिन्नौर ७२००-७४००, ११२१-१००००-११०००, आंबेमोहोर (सुवासिक) १८०००-२००००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार १००००-११०००, बासमती तिबार ११०००-१२०००, बासमती मोगरा ६५००-७५००, बासमती कणी ४०००-५०००, इंद्रायणी ६०००-७०००रु.

Back to top button
Don`t copy text!