ऑटो रिक्षा चालकांना १० हजारांचा सन्मान निधी; फलटणच्या दोघांना मिळणार लाभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधीतून पात्र सभासदांना १० हजार रुपये दिले जाणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या दोघांची निवड झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधीअंतर्गत पात्र सभासदांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे बाळासाहेब कांबळे आणि हमीद मेटकरी यांना या योजनेचा लाभ ३ सप्टेंबर रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या कार्यक्रमात दिला जाणार आहे.

कोणाला मिळणार सन्मान निधी?

१ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच १ जून २०२६ पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना प्रत्येकी १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येणार आहे. बाळासाहेब कांबळे आणि हमीद मेटकरी यांना ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पात्र सभासदांनी बँक खात्याची माहिती भरावी

सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी पात्र सभासदांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या बँक खात्याची आवश्यक माहिती तातडीने भरावी. पात्र सभासदांनी ही प्रक्रिया पूर्ण करून सन्मान निधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!