सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध : भारत जाधव


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील सुयश ऑटो सेवकाची सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली या वेळी सभासदांना टक्के लाभांश जाहीर करून सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध आल्याचे संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष पोपट घुले, सचिव नंदकुमार गवारे, संचालक धर्मेंद्र घोडके, अशोक पवार, नागेश जाधव, सोमनाथ भोंग व कंपनीचे प्लॅन्ट हेड मनोज इंगळे, व्यवस्थापक महेंद्र निगडे व वरिष्ठ अधिकारी शिरीष राऊत आदी मान्यवर उपस्तित होते. पाच लाखापर्यंत तातडीचे कर्ज, आपत्कालीन कर्ज पन्नास हजार देण्यात येणार असून सभासदाच्या दहावी व बारावीतील उत्तीर्ण पाल्याचा सत्कार व प्रत्येक सभासदाचा दोन लाखाचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भारत जाधव यांनी दिली. शिवराज जाधव, आदित्य जाधव, दीप्ती गोफणे, सार्थक भोंग, करण जाधव, अथर्व सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा दहावी पास झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. अहवाल वाचन सचिव नंदकुमार गवारे यांनी केले सूत्रसंचालन दिनेश देशमुख आभार पोपट घुले यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!