जाहीर नोटीस: ‘दि वाई अर्बन को-ऑप. बँक’च्या आजी-माजी संचालकांवर फौजदारी खटला दाखल; तावडी येथील मिळकतीबाबत व्यवहार न करण्याचे आवाहन!
तमाम लोकांना या जाहीर नोटिशीद्वारे सूचित करण्यात येते की, ‘दि वाई अर्बन को. ऑप. बँक, वाई’ आणि तावडी (ता. फलटण) येथील एका मिळकतीबाबत खालीलप्रमाणे महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
लेखापाल अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार, ‘दि वाई अर्बन को. ऑप. बँक, वाई’चे अध्यक्ष, नवीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांनी संगनमत करून पैशांचा अपहार केल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या अपहारास बँकेचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी जबाबदार असून, यावरून बँकेची लोकांना फसवण्याची मानसिकता दिसून येत आहे.
कायदेशीर कारवाई:
या प्रकरणी दि वाई अर्बन को. ऑप. बँक, वाई यांचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी यांच्यावर फलटण येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला असून, सदर खटला सध्या प्रलंबित आहे.
मिळकतीचे वर्णन व नागरिकांना इशारा:
मिळकत: गट नंबर ६९, मौजे तावडी, ता. फलटण, जि. सातारा.
अशा प्रलंबित खटल्याच्या परिस्थितीत, वरील मिळकतीसंदर्भात कोणीही कसलेही व्यवहार करू नयेत. जर कोणी असे व्यवहार केले आणि त्यातून कोणाचे काही नुकसान झाले, तर त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. कोणाचीही आणखी फसवणूक होऊ नये म्हणून ही जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.