भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम सप्रे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीचे कार्येकर्त व प्रदेश मीडिया विभागाचे सहसंयोजक श्रीपाद तथा श्याम सप्रे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सप्रे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश महामंत्री ( मुख्यालय ) अतुल वझे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

पक्षासाठी कोणतेही काम करण्याची तयारी दाखवणारे सप्रे हे खरेखुरे कार्यकर्ते होते. या संकटाच्या काळात भारतीय जनता पार्टी सप्रे यांच्या कुटुंबियांच्या मागे उभी राहील, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी,  ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मनोगत व्यक्त केले.

केंद्रीय रस्ते बांधणी व परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शोकसंदेशाद्वारे सप्रे यांना आदरांजली वाहिली.

अतिशय विनम्र, साधे आणि वयाच्या ७३ व्या वर्षी सुद्धा उत्साहाने, सातत्याने पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता अशी श्याम सप्रे यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थी परिषदेचे काम केले. हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.  भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मीडिया विभागात अनेक वर्षांपासून ते कार्यरत होते.


Back to top button
Don`t copy text!