पर्यटन विकासासाठी एकत्र या; मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांसह अधिका-यांना कोयनाकाठी सूचना


 

स्थैर्य, सातारा, दि.११ : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो. सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा. अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला शासन चालना देईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) येथील काेयना धरण भेटीनंतर दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाला भेट दिली. यावेळी ठाकरे यांनी लाेकप्रतिनिधींशी पाटण तालुक्याच्या विकास आरखड्याबाबत चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकारमंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपुत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी जलसंदा विभागाचे सचिव श्री. घाणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी कोयना धरणाची संपूर्ण माहिती दिली. कोयना धरण पहाणीनंतर अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!