स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या लोणंद शाखेचा प्रथम वर्धापन दिन; आज सत्यनारायण पूजेचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्वराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण यांच्या लोणंद शाखेचा आज (३० एप्रिल) प्रथम वर्धापन दिन असून, या निमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सभासद व खातेदारांनी उपस्थित राहण्याचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांचे आवाहन.

स्थैर्य, फलटण, दि. ३० एप्रिल : ‘विश्वासातून समृद्धीकडे’ अशी यशस्वी वाटचाल असणाऱ्या स्वराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण या संस्थेच्या ‘लोणंद शाखेचा’ आज (दि. ३० एप्रिल) प्रथम वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखेच्या वतीने आज सत्यनारायण पूजेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

ही सत्यनारायण पूजा आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम लोणंद येथील खंडाळा रोडवरील ‘शास्त्री चौक’ येथे असलेल्या लोणंद शाखेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी ११:०० ते सायंकाळी ०६:०० या वेळेत सर्व उपस्थितांना तीर्थप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेला व तीर्थप्रसादाला संस्थेच्या सर्व खातेदारांनी, सभासदांनी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!