स्थैर्य, सातारा, दि.११: दक्षिण दरवाजाच्या बाजूस असलेल्या दाट झाडीत अघोरी प्रथेचा प्रकार उघडकीस आला आहे. जंगलातील झाडाला बकऱ्याची कातडी अडकवलेली असून तेथे चुल आणि होमहवन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी हळदी-कुंकू, लिंबू, नारळ,विड्याची पाने, शिजवलेल अन्न आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या ठिकाणी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून घडलेल्या प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.