स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकारकडून व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रम जाहीर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
केंद्र सरकारकडून व्यापक नागरी सेवा सुधारणा कार्यक्रम जाहीर
ADVERTISEMENT


 केंद्रीय मंत्रिमंडळाने मिशन कर्मयोगी – नागरी सेवा क्षमता निर्मितीच्या नवीन राष्ट्रीय आराखड्याला दिली मंजुरी

स्थैर्य, दिल्ली, दि.३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खालील संस्थात्मक चौकटीसह राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम (एनपीसीएससीबी) सुरु करायला मंजुरी दिली आहे.

i) पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक मनुष्यबळ परिषद

(ii) क्षमता विकास आयोग

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

(iii) डिजिटल मालमत्ता मालकी आणि परिचालन तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म साठी विशेष प्रयोजन कंपनी (एसपीवी)

(iv) कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय युनिट

प्रमुख वैशिष्ट्ये:

राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रमाची काळजीपूर्वक रचना केली आहे जेणेकरून जगभरातील उत्तम संस्थां आणि पद्धतींमधील शैक्षणिक संसाधनांचा स्वीकार करतानाच भारतीय संस्कृती आणि संवेदनशीलता यात ती खोलवर रुजलेली असेल. एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण – iGOT Karmayogi Platform च्या स्थापनेद्वारे हा कार्यक्रम उपलब्ध होईल. या कार्यक्रमाची मुख्य मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे -:

(i) ‘नियम आधारित’कडून भूमिका आधारित’ मनुष्यबळ व्यवस्थापन परिवर्तनाला सहकार्य करणे. नागरी सेवकांना कामाचे वाटप त्यांच्या पदाच्या गरजेनुसार त्यांच्या क्षमतेशी जोडणे

(ii) ‘ऑफ साइट शिक्षण पद्धतीला पूरक ‘ऑन साइट शिक्षण पद्धतीवर भर देणे

(iii) शिक्षण सामग्री, संस्था आणि कार्मिक सहित सामायिक प्रशिक्षण पायाभूत संरचना असलेली परिसंस्था निर्माण करणे

(iv) नागरी सेवेशी संबंधित सर्व पदांना भूमिका, कार्ये, आणि क्षमता (एफआरएसी) संबंधी दृष्टिकोनानुसार अद्ययावत करणे आणि प्रत्येक सरकारी संस्थेत निवडक एफआरएसीला प्रासंगिक शिक्षण सामुग्रीची निर्मिती करणे आणि पुरवणे

v) सर्व नागरी सेवकांना आत्मप्रेरित आणि आदेशित शिक्षण पद्धतीमध्ये त्यांचे वर्तन , कार्य आणि कार्यक्षेत्र संबंधित क्षमता निरंतर विकसित आणि मजबूत करण्याची संधी उपलब्ध करून देणे

vi) प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी वार्षिक वित्तीय योगदानाच्या माध्यमातुन शिकण्याच्या सामायिक आणि समान परिसंस्था निर्माण करण्यासाठी आपापल्या संसाधनांमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी सर्व केन्द्रीय मंत्रालये आणि विभाग आणि त्यांच्या संघटनांना सक्षम बनवणे.

(vii) सार्वजनिक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे , स्टार्ट-अप आणि व्यक्तिगत तज्ञांसह शिक्षण संबंधी सर्वोत्तम सामुग्रीच्या विकासाला प्रोत्साहन देणे आणि भागीदारी करणे

(viii) क्षमता विकास, आशय निर्मिती, वापरकर्त्यांचा प्रतिसाद आणि क्षमतेनुसार तसेच धोरणात्मक सुधारणांसाठी क्षेत्रांची निवड करण्याबाबत आयजीओटी -कर्मयोगी द्वारा पुरवण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करणे

उद्देश:

एक क्षमता विकास आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून सहकार्यात्मक आणि सामायिक आधारावर क्षमता विकास परिसंस्था व्यवस्थापन आणि नियमनात एकसमान दृष्टिकोन सुनिश्चित करता येईल.

आयोगाची भूमिका पुढीलप्रमाणे असेल-

• वार्षिक क्षमता विकास योजनांना मंजुरी देण्यात पीएम सार्वजनिक मनुष्यबळ परिषदेला सहाय्य करणे.

• नागरी सेवा क्षमता विकास संबंधी सर्व केंद्रीय प्रशिक्षण संस्थावर देखरेख ठेवणे

• अंतर्गत आणि बाहेरचे शिक्षक आणि संसाधन केंद्रांबरोबर सामायिक शिक्षण संसाधनांची निर्मिती करणे

• हितधारक विभागांबरोबर क्षमता विकास योजनाच्या अंमलबजावणीवर समन्वय आणि देखरेख ठेवणे

• प्रशिक्षण आणि क्षमता विकास, शिक्षण शास्त्र आणि पद्धतीच्या मानकीकरणाबाबत शिफारशी सादर करणे

• सर्व नागरी सेवांमध्ये मिड-करिअर प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी निकष ठरवणे

• सरकारला मनुष्यबळ व्यवस्थापन आणि क्षमता विकास क्षेत्रांमध्ये आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेप सुचवणे

iGOT- कर्मयोगी प्लॅटफॉर्म भारतात दोन कोटींहून अधिक अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्यापक आणि अत्याधुनिक संरचना उपलब्ध करेल. हा प्लॅटफॉर्म शैक्षणिक सामुग्रीसाठी एक आकर्षक आणि जागतिक दर्जाची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये काळजीपूर्वक संकलित केलेली माहिती आणि डिजिटल ई–लर्निंग सामग्री उपलब्ध केली जाईल. क्षमता विकास व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थी कालावधीनंतर पुष्टीकरण, उपयोजन, कामाचे वाटप आणि रिक्त पदांची अधिसूचना इ. सेवांसंदर्भातील बाबी प्रस्तावित कार्यकुशलतेच्या चौकटीत एकत्रित केल्या जातील.

भविष्यासाठी भारतीय नागरी सेवकाला अधिक सर्जनशील, रचनात्मक अधिक क्रियाशील, व्यावसायिक, प्रगतीशील, ऊर्जावान, सक्षम,पारदर्शक आणि तंत्रज्ञान सक्षम बनवणे हे मिशन कर्मयोगीचे उद्दिष्ट आहे. विशिष्ट भूमिका-क्षमतानी सुसज्ज नागरी सेवक उच्च गुणवत्ता मानकांच्या प्रभावी सेवा सुनिश्चित करू शकेल.

आर्थिक भार:

सुमारे 46 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 2020-2021 पासून 2024-25 पर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत 510.86 कोटी रुपये खर्च केले जातील. हा खर्च 50 दशलक्ष डॉलर्स इतक्या बहुपक्षीय सहाय्यातुन आंशिक स्वरूपात केला जाईल. एनपीसीएससीबीसाठी संपूर्ण मालकीचे स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 8 अंतर्गत स्थापन केले जाईल. एसपीव्ही ही ‘नफ्यासाठी नसलेली’ कंपनी असेल आणि आयजीओटी-कर्मयोगी प्लॅटफॉर्मची मालकी आणि व्यवस्थापन करेल. एसपीव्ही सामग्रीचे प्रमाणीकरण, स्वतंत्र प्रक्षेपित मूल्यमापन आणि टेलिमेटरी डेटा उपलब्धतेशी संबंधित सामग्री, बाजारपेठेचे ठिकाण आणि मुख्य व्यवसाय सेवा व्यवस्थापन करेल. केंद्र सरकारच्या वतीने एसपीव्हीकडे सर्व बौद्धिक संपत्ती अधिकार आहेत. आयजीओटी-कर्मयोगी प्लॅटफॉर्मच्या सर्व वापरकर्त्यांच्या कार्यक्षमतेच्या मूल्यांकनासाठी एक योग्य देखरेख आणि मूल्यांकन व्यवस्था देखील ठेवली जाईल जेणेकरून प्रमुख कामगिरीचा डॅशबोर्ड तयार केला जाऊ शकेल.

पृष्ठभूमि:

नागरी सेवांची क्षमता विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात , कल्याणकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आणि प्रशासनाशी संबंधित कामे पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कार्य संस्कृतीतील परिवर्तन, सार्वजनिक संस्थाचे बळकटीकरण आणि नागरी सेवा क्षमता निर्माण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून नागरी सेवा क्षमतांमध्ये परिवर्तनात्मक बदल आणण्याचा प्रस्ताव आहे जेणेकरून नागरिकांना प्रभावीपणे सेवा पुरवता येतील.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक मनुष्यबळ परिषदेत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, प्रख्यात मनुष्यबळ अभ्यासक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ असतील जे क्षमता वाढवण्याच्या कार्याला धोरणात्मक दिशा देतील.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: देश
ADVERTISEMENT
Previous Post

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर वडूज पोलिसांची कारवाई

Next Post

पावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा

Next Post
पावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा

पावलांची ठेवण आणि चप्पल मधील बदल करा आणि टाच दुखीला राम राम करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई

January 20, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

सावधान! माण तालुक्यात 97 कोंबड्यांचा मृत्यू

January 20, 2021
सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

सातारा-पंढरपूर एसटी बस दरोडेखोरांचा कब्जा; दगडफेकीत चालक जखमी

January 20, 2021
काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

January 20, 2021
काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

काशीळ येथे जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांची कारवाई

January 20, 2021
“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

“…तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ”; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

January 19, 2021
ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…

January 19, 2021
आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

January 19, 2021
रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन: अभियानाचे उद्घाटन

January 19, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

43 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 19, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.