
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
बारामती एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीच्या गोडावूनला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; परंतु वित्तहानी झालेली आहे.
१५००० स्क्वेअर फुटाच्या गोडावूनला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये बिस्कीट, चॉकलेट, कुरकुरे इ. खाद्य खाद्यपदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये होता. अद्याप आग विझवण्याचे काम चालू आहे. बारामती एमआयडीसी अग्निशामक दल यांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले आहे.
