भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे.पी.नड्डा भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार


स्थैर्य, मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित पक्ष पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक सोमवार दिनांक 27 जुलै रोजी होणार असून भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी हे व्हर्च्युअल माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.

सोमवार दि २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठकीस प्रारंभ होणार असून प्रारंभी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील हे बैठकीत प्रास्ताविक करतील. यावेळी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाचे मुंबईत असणारे पदाधिकारी उपस्थित राहतील तर अन्य ठिकाणी असणारे पदाधिकारी आपआपल्या ठिकाणाहून ऑनलाईन पध्दतीने बैठकीत सहभागी होतील.

चंद्रकातदादा पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर भाषण होईल. यानंतर विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत प्रस्ताव मांडला जाईल व या बैठकीचा समारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!