आळजापूर येथे उद्या विविध विकाससकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा


दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून फलटण-कोरेगावचे आमदार दीपकराव चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेल्या आळजापूर (ता. फलटण) येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम हनुमान मंदिर, आळजापूर येथे होणार आहे.

हा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून आमदार दीपकराव चव्हाण या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, संतकृपा उद्योग समूहाचे चेअरमन विलासराव नलवडे, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ तसेच हिंगणगाव गटातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी १ कोटी १० लाख रुपयांची लोकार्पण होणारी कामे अशी : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, मागासवर्गीय परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण, स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण, फडतरेवस्ती गणेश मंदिर सभामंडप, पवार मळा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, आळजापूर ते पवार मळा रस्ता, मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती रस्ता, दिनानाथ ओढा ते आदर्की शिव रस्ता, मागासवर्गीय वस्ती हायमास दिवे बसविणे, मागासवर्गीय वस्तीमध्ये आर.ओ. मशीन बसविणे, मसुगडे आळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे सोलर लाईटची व्यवस्था, नलवडे मळा ते आळजापूर फाटा नवी जलजोडणी, मागासवर्गीय वस्ती पेव्हर ब्लॉक बसविणे, जिल्हा परिषद शाळा रूफ वॉटर हार्वेस्टींग, आळजापूर डेपो हायमास पोल बसविणे, जिल्हा परिषद शाळा आळजापूर वर्गखोली बांधणे.

उद्घाटन होणारी ६१ लाख ९४ हजार रुपयांची कामे अशी : आळजापूर फाटा ते आळजापूर गाव रस्त्याचे डांबरीकरण, आळजापूर जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती, शाळा संरक्षक भिंत, विद्यार्थ्यांसाठी शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची टाकी दारे, खिडक्या, सेफ्टी, अंगणवाडी येथे सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन बसविणे, स्मशानभूमी येथे हातपंप-हॅण्डवॉश स्टेशन बसविणे, आळजापूर येथील वाढीव सभागृह बांधकाम करणे, आळजापूर गावठाण बंदीस्त गटर करणे, मागासवर्गीय वस्तीमध्ये स्टेज बसविणे, जिल्हा परिषद शाळा पवार मळा शौचालय दुरूस्ती करणे, दरवाजा चौक परिसर सुशोभीकरण करणे, भैरवनाथ मंदिर परिसर हातपंप बसविणे, आळजापूर गाव कुंभारवाडा ते शिंदेवस्ती रस्ता बनविणे, आळजापूर ते नलवडे मळा पवार मळा रस्त्याचे डांबरीकरण करणे, आळजापूर जिल्हा परिषद शाळा रूफ वॉटर हार्वेस्टींग करणे, जिल्हा परिषद शाळा पाणीपुरवठा व्यवस्था करणे.

या कार्यक्रमास हिंगणगाव गटातील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आळजापूर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच दिलीप नलवडे, उपसरपंच सौ. छाया नलवडे, माजी उपसरपंच सौ. राजकुंवर नलवडे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!