
दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लिंब येते तेथीलच गणेश शिवाजी माने याने पत्नी प्रियांका गणेश माने हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे आई वडील देवाच्या कार्यक्रमासाठी घरी आल्याच्या कारणावरून तिला शिवीगादम अटी करून लोखंडी पाईप व सळईने मारहाण केली. तसेच तिचे वडील संतोष मोरे व आई मंगल मोरे हे भांडणे सोडण्यासाठी आले असता त्या दोघांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.