
दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी कोडोली येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास कोडोली येथे घराच्या समोर रस्त्यावर तेथीलच रीना रणजीत माहु तिचा लहान भाऊ सोहम मित्रांबरोबर खेळत होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या दिलीप पासवान आणि त्यांची आई यांनी सोहम याला शिवीगाळ केली. याबाबत रीना माहू यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून दुखापत केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.