
दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास सदर बझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे तेथीलच तुषार सुरेश मिरेकर व त्यांचे वडील सुरेश मिरेकर आई संगीता मिरेकर असे तिघे घरात जेवायला बसले होते. त्यावेळी सखाराम सुबाराम मिरेकर आणि विकास अनिल शिंदे दोघेही रा. सातारा यांनी घराच्या कारणावरून भांडण करून मारहाण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.