
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, खंडाळा, दि. २१ : खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणाहून जप्त केलेल्या 72 ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव खंडाळा तहसिलदार कार्यालय याठिकाणी गुरुवार दि. 23 जूलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केल्याची माहिती खंडाळा तहसिलदार दशरथ काळे यांनी दिली.
यावेळी वाई प्रांताधिकारी संगिता चौगुले-राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जप्त वाळूसाठ्यांचा लिलाव होणार आहे.वाळूसाठ्याचा लिलावाबाबतच्या सर्व नियम व अटी खंडाळा तहसिलदार कार्यालय याठिकाणी लावण्यात आले असून लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खंडाळा तहसिल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे वाळू लिलावामध्ये बांधकाम व्यवसायिक ,वाळू व्यवसायिक यांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
