दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महिलेला पेट्रोल ओतून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न तिच्या पतीने केल्याची घटना पिंप्रद (ता. फलटण) येथे घडली असून या घटनेत महिला बचावली असून जखमी झाली आहे. दरम्यान, महिलेचा मुलगा आईला वाचविताना भाजून जखमी झाला आहे. ही घटना दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसात महिलेच्या सूनेने फिर्याद दिली असून महिलेचा पती आरोपी शंकर महादेव पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तोसुद्धा हाताला आणि तोंडाला किरकोळ भाजलेला आहे. त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
या घटनेचा अधिक तपास सपोनि हुलगे करत आहेत.