धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करा; फलटण तालुका धनगर समाजाच्या वतीने प्रांतांना निवेदन


स्थैर्य, फलटण : धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत फलटण तालुका धनगर समाजाच्या वतीने फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना फलटण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करा हा मागणीसह अन्य प्रमुख मागण्या रक्त लिखित स्वरूपात दिलेल्या आहेत.

या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी अशी आहे की धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू कराव्यात. धनगर समाजासाठी विविध 22 योजना मंजूर आहेत. त्याची अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी व त्यासोबतच धनगर समाजातील मेंढपाळांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना शासनाच्या वतीने करण्यात याव्यात. अशा विविध प्रकारच्या मागण्या फलटण तालुका धनगर समाजाच्या वतीने फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे केलेल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!