दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२३ । मुंबई । इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने त्यांची भव्य हंगामी ऑफर आझादी मेगा सेलच्या शुभारंभाची घोषणा केली. भव्य ट्रॅव्हल सेल्स व सूट १० ऑगस्ट २०२३ पर्यंत सक्रिय असतील. इझमायट्रिप आझादी मेगा सेल इझमायट्रिपची अधिकृत वेबसाइट व अॅपवर लाइव्ह असेल. सेलमध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत फ्लाइट्स, हॉटेल्स, कॅब्स, बसेस्, क्रूझेस् व हॉलिडे पॅकेजेसवर अनेक सूटचा समावेश असेल.
ग्राहक पेमेंट प्रक्रियेदरम्यान कूपन कोड ‘इएमटीआझादी’चा वापर करत सूट कार्निवलचा भाग बनू शकतात. इझमायट्रिपचे वापरकर्ते फ्लाइट बुकिंग्ज व हॉटेल बुकिंग्जवर काही आकर्षक डिल्ससह ऑफरवर मोठ्या बचतींचा आनंद घेऊ शकतील. अतिरिक्त सूटचा लाभ घेण्यासाठी आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड्स, तसेच अॅमेझॉन पे क्रेडिट कार्ड्स (५ ऑगस्टपर्यंत) आणि आरबीएल बँक क्रेडिट कार्ड्स (६ ते ७ ऑगस्ट) वापरत बुकिंग्ज करा.
सेल कालावधीदरम्यान प्रत्येक ग्राहकाला विविध ब्रॅण्ड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स जिंकण्याची संधी आहे. तसेच, सेल कालावधीदरम्यान प्रतिदिन काही भाग्यवान विजेत्यांना सर्व निवडक (सहभागी) ब्रॅण्ड सहयोगींकडून रिवॉर्डस् मिळण्याची देखील संधी आहे. आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर सेलनंतर विजेत्यांची घोषणा करण्यात येईल.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, “इझमायट्रिप बॅण्डवॅगन नव्या उंचीवर पोहोचत आहे, जेथे आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम डिल्स दिल्या आहेत. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही आमच्या निष्ठावान ग्राहकांना, तसेच नवीन ग्राहकांना इझमायट्रिपसह सुलभ बुकिंगचा अनुभव घेण्यास, तसेच आमच्या आझादी मेगा सेलसह सर्व श्रेणींमध्ये व्यापक सूटचा लाभ घेण्यास आमंत्रित करत आहोत. सणासुदीचा काळ सुरू होण्यासह आम्ही ग्राहकांना त्यांच्या ट्रॅव्हल बुकिंग्जचा आनंद घेण्यासाठी अधिक विशेष डिल्स व बचत देण्यास उत्सुक आहोत.”