बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनिल केळगणे यांनी साधली आर्थिक प्रगती


महाराष्ट्र शासनाच्या अनसूचित जमाती उपयोजनेंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाती. या योजनेचा महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली येथील शेतकरी अनिल बळवंत केळगणे यांना या योजनेंतर्गत जुनी विहिर दुरुस्ती, पंपसंच, पीव्हीसी पाईप व परसबाग यासाठी अनुदान मिळाले या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांचीही यशोगाथा.

श्री. केळगणे यांना 0.47 हे. आर शेत जमिन. यामध्ये एक विहिर परंतु जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विहिरी संपूर्णपणे गाळाने भरुन गेली त्याचबरोबर विहिरीचे बांधकाम पडून विहिरीवरील विद्युत पंपही खराब झाला. शेतीच्या सिंचनाचा मोठा प्रश्न उभा राहिला. विहिर दुरुस्त करणे व नवीन पंप संच घेण्याची परिस्थितीही नव्हती. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. श्री. केळगणे यांचे कुटुंब शेत मजुरी करु लागले.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी उपयोजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची माहिती महाबळेश्वरच्या पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी यांनी सांगितली. लागणारे कागदपत्रांची पुर्तता करुन या योजनेंतर्गत विहिर दुरुस्ती करिता 50 हजार, विहिरी वरील पंप संचासाठी 20 हजार, पाईपलाईनसाठी 30 हजार व परसबागेसाठी 500 रुपये असे एकूण 1 लाख 500 रुपये बँक खात्यावर जमा झाले.

जुनी विहिरी दुरस्ती अनुदानातून विहिरीचे काम करण्यात आले. यामुळे सिंचन क्षमताही वाढली. पंप संचही बसविण्यात आला. त्याचबरोबर सर्व शेतामध्ये पाईपलाईनही करण्यात आली. परसबागेमध्ये भेंडी, गवार, दुधी, भोपाळा,शेगाव, काकडी, कारले, दोडका ही पिके घेऊन रोजच्या रोज बाजार पेठेत विकण्यासाठी स्वत: घेवून जातात. यामुळे रोजच्या गरजांसाठी लागणारे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.

महाबळेश्वरच्या गट विकास अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर भेट दिली असता त्यांनी सेंद्रीय शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनामुळे चविष्ठ व टिकावून स्टॉबेरीचे पिक घेतले. खर्च वजा जाता 74 हजार रुपयांचा फायदा मिळाला. तसेच रब्बी हंगामात गहू उत्पादनातून 15 हजार रुपयांचा फायदा झाला.

महाराष्ट्र शासनाच्या अनसूचित जमाती उपयोजनेंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभा मुळे स्वत:च्या शेतामध्ये काम करुन माझे जीवनमान उंचावले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असेही अनिल केळगणे सांगतात.


Back to top button
Don`t copy text!