कोळकीत भीतीचे वातावरण; कोळकीला पूर्ण वेळ ग्रामसेवक नेमण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ४ : करोना म्हणजेच कोव्हीड १९ या आजाराने जगभरात थैमान घातलेले आहे. आपल्या देशात दोन लाखाहून  करोना म्हणजेच कोव्हीड १९ चे रुग्ण आहेत. फलटण शहराच्या शेजारील म्हणजेच फलटण शहराचे उपनगर असलेल्या कोळकी मध्ये नुकताच पुन्हा एकदा मुंबई वरून आलेल्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाला. त्यामुळे कोळकीला पुन्हा एकदा हादरून सोडलेले आहे. अश्या मध्ये सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या व जवळपास १५ हजार नागरीवस्ती असलेल्या गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक द्यावा अशी मागणी कोळकी येथील नागरिकांमधून होत आहे. 

कोळकी ता. फलटण येथे सुमारे १४ दिवसापूर्वी अक्षतनगर या भागामध्ये मुंबई वरून आलेला करोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या नंतर ग्रामपंचायत प्रशाशन खडबडून जागे झाले. कोळकी येथील अक्षतनगर हा परिसर फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला. त्या नंतर अक्षतनगर मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी व तेथील ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत कंटेंटमेंट झोन मधील सर्व नागरिकांना घरपोच किराणा, भाजीपाला व औषधे पुरवण्यात आली. परंतु त्या काळात व आता नंतरच्या काळात त्या परिसरामध्ये भाजीपाला विक्रते व अत्यावश्यक सेवा बजवणारे जाण्यास जरा भीत असल्याचे समोर येत आहे. अश्या सर्व परिस्थिती मध्ये कोळकी गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक नेमावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सध्याचे कोळकी गावच्या ग्रामसेवकांकडे विडणीचा चार्ज असल्याने तालुक्यातील दोन मोठी गावे हाताळताना ग्रामसेवकांची तारेवरची कसरत होत आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून कोळकीची ओळख जिल्ह्यासह राज्यात आहे. त्या मुळे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी मध्ये लक्ष घालून कोळकी गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक नेमावा अशी चर्चा दबक्या आवाजात ग्रामपंचायत वर्तुळात सुरु आहे. 

सध्या कोळकीमध्ये अवैध व्यवसायांना ऊत आला असून नुकताच कोळकी येथील मालोजीनगर भागामध्ये जुगार अड्ड्यावर छापा पडला होता. अश्या प्रकारे अनेक अवैध व्यवसाय कोळकीमध्ये राजरोसपणे सुरु असून या वरही कडक कारवाई करावी व कोळकीला अवैध व्यवसाय मुक्त करावे अशी मागणी कोळकी मधील नागरिक करीत आहेत.  


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!