फलटणमध्ये आज ‘अमृत कलश यात्रा’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा आज, शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून आलेले अमृत कलश घेवून मिरवणूक पंचायत समिती येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाना पाटील चौक, आंबेडकर चौक ते पंचायत समिती कार्यालय अशी काढण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली.

या यात्रेसाठी खासदार, आमदार तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचायत समिती कार्यालय व सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.

या अमृत कलश यात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!