श्री दत्त इंडिया कारखान्यावर १६ रोजी स्वाभिमानी संघटनेचा भव्य शेतकरी मोर्चा


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून श्री दत्त इंडिया कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा दि. १६ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा निघणार आहे.

फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले आहे की, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार साखरवाडीच्या श्री दत्त इंडिया साखर कारखान्याने मागील वर्षीचा दर ३४११ रूपये दसर्‍यापूर्वी द्यावा, या मागण्यासाठी सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी कारखाना गेटसमोर बहुसंख्येने उपस्थित रहावे.


Back to top button
Don`t copy text!