कोळकी येथे आज भव्य कलावंत मेळावा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
लोक कलावंत गोंधळी वाघ्या मुरळी, महाराष्ट्र राज्य परिषद, फलटण यांच्या सांस्कृतिक कला विभागातर्फे आज, शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी भव्य कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात सकाळी १०.०० वाजता होणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण असणार आहेत. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी सर्व कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कला विभागाकडून करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!