महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रा’साठी ऑनलाईन पोर्टल सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

जमिनीची मालकी नसली तरी प्रत्यक्ष शेतीकाम करणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ मिळणार असून कृषी विभागाने पोर्टल सुरू केले आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २४ सप्टेंबर : शेती क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी विशेष ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरी प्रत्यक्ष शेती, पशुसंवर्धन किंवा दुग्धव्यवसाय करणाऱ्या महिलांना सरकारी योजना, कृषी पतकर्ज आणि विम्याचा लाभ घेणे सोपे होणार आहे.

ग्रामसभेच्या पडताळणीनंतर १५ दिवसांत प्रमाणपत्र

१८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या आणि शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात कार्यरत असलेल्या सर्व महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र असतील. ऑनलाईन अर्जाची पडताळणी संबंधित ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या बैठकीत केली जाईल. ग्रामसभेने मंजुरीचा ठराव दिल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे.

शासकीय योजना आणि पतकर्जाचा मार्ग मोकळा

ग्रामीण भागात अनेक महिला कुटुंबातील सदस्यांच्या जमिनीवर प्रत्यक्ष काम करतात, मात्र नाव नसल्याने त्यांना शेतकरी मानले जात नव्हते. या प्रमाणपत्राद्वारे महिला शेतकऱ्यांचा अधिकृत डेटाबेस तयार होणार असून, बचत गट सदस्यांना अनुदानाच्या योजना व कृषी निविष्ठांचा लाभ प्राधान्याने मिळण्यास मदत होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!