सात देशांच्या राजदुतांनी आपली अधिकार पत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रपतींना केली सादर


स्थैर्य, नवी दिल्ली, 21 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज डेमोक्रटीक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, सेनेगल, त्रिनिनाद आणि टोबेगो, मॉंरिशस, ऑस्ट्रेलिया, कोट  दी आयव्हरी आणि रवांडा  या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारपत्रे स्वीकारली.

राष्ट्रपती भवनाच्या इतिहासात प्रथमच अधिकारपत्रे  डिजिटल माध्यमातून सादर करण्यात आली. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानावर मात करणे डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत असून कामे कल्पक पद्धतीने करणेही शक्य होत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.अधिकारपत्रे  सादर करण्याचा हा डिजिटल कार्यक्रम म्हणजे राजनैतिक समुदायासमवेत भारताच्या असलेल्या संबंधात विशेष दिवस असल्याचे ते म्हणाले.भारतीय जनतेच्या आणि जगाच्या प्रगतीसाठी डिजिटल मार्गाच्या अमर्याद शक्यता आजमावण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 महामारीमुळे जागतिक समुदायासमोर अभूतपूर्व आव्हान निर्माण झाले असून या संकटाने अधिक जागतिक सहकार्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे राष्ट्रपतींनी या राजनैतिक अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. या महामारीविरोधातल्या लढ्यात सहकारी राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात भारत आघाडीवर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज या राजदूत/ उच्चायुक्त यांनी अधिकारपत्रे  सादर केली

चो हुई चाओल, डेमोक्रटीक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचे राजदूत

अब्दुल वाहाब हैदरा,सेनेगलचे राजदूत

डॉ रॉजेर गोपूल,त्रिनिनाद आणि टोबेगोचे  उच्चायुक्त

सांती बाई हनुमंजे, मॉंरिशसच्या उच्चायुक्त

ब्यारी रॉबर्ट ओ फरेल, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त

एनड्राय एरिक कॅमिली, कोट  दी आयव्हरी राजदूत

जाकलीन  मुकान्गिरा,रवांडाच्या उच्चायुक्त

आजच्या कार्यक्रमाने भारताच्या डिजिटल राजनैतिक घडामोडीमधे नवे परिमाण दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!