प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना शोधण्यात पुणे पोलिसांना ३३ दिवसांनंतर यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पुणे, दि.२४ : ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे पोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत. 

गौतम पाषाणकर हे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते.

त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती. पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. 

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले. त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. 

आनेवाडी टोल नाका धुमश्चक्री प्रकरणाच्या सुनावणीसाठी खा.उदयनराजे वाई न्यायालयात

गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी घरासमोरुन बाहेर पडल्यावर ते थेट स्वारगेटला आले होते. तेथून त्यांनी भाड्याची एक कार ठरविली व ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे.

कोरोनाचे संकट असताना व कोणताही गुन्हा नसताना गौतम पाषाणकर यांच्या निघून जाण्याने पोलीस पथक गेले अनेक दिवस त्यांच्या शोधामध्ये गुंतून पडले होते. उद्या सायंकाळपर्यंत पोलीस त्यांना घेऊन पुण्यात येईल. 

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त.

केंद्र सरकारचा आणखी एक डिजीटल स्ट्राईक; तब्बल 43 अ‍ॅप्सवर बंदी


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!