आनेवाडी टोल नाका धुमश्चक्री प्रकरणाच्या सुनावणीसाठी खा.उदयनराजे वाई न्यायालयात


 

स्थैर्य, वाई, दि.२४: आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा प्रकरणात खा.उदयनराजे व आमदार शिवेंन्द्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेल्या धुमश्चक्री प्रकरणी सुनावणीसाठीखा.उदयनराजे भोसले वाई न्यायालयात आज सुनावणी हजर झाले.

आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते.टोलनाक्याचे त्याचे व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता.

 

६ आक्टोबर २०१७ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचे ताबा घेण्या वरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमचक्री झाली.

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना शोधण्यात पुणे पोलिसांना ३३ दिवसांनंतर यश

जमावबंदीचा आदेश लागू असताना धुमश्चक्री झाली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी उदयनराजे व अन्य पंधरा जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोल नाक्यावर झालेला धुमश्चक्री नंतर सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता त्यावेळी अज्ञाताकडून गोळीबरही झाला होता. या प्रकरणामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते.मात्र उदयनराजे हजर झाले नव्हते. उदयनराजेवर अनेक वेळा साक्षी समन्स बजावण्यात आले होते. याकमी आज दुपारी उदयनराजे अशोक सावंत, राजू गोडसे ,बाळासाहेब ढेकणे ,सनी भोसले, मुरलीधर भोसले, अजिंक्य भोसले, इम्तियाज बागवान, बंडा पैलवान, किरण कुऱ्हाडे आदी प्रमुख संशयितांसह स्वतः हून वाई न्यायालयात हजर झाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एन गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद एकूण पुढील सुनावणी दि ७ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजेंच्या वतीने ताहेर मणेर यांनी काम पाहिले.

कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला; सांगलीचे चौघे गजाआड

उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती .यावेळी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!