मानपान, दिखावा यांना छेद देणारा नेता : समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
मानपान, मोठेपणा, दिखावा त्याचबरोबर प्रसिद्धीसाठी हपापलेपण हे सत्ता आल्यानंतर सर्वांकडे आल्याचे दिसते. मात्र, या सर्वांना छेद देत ‘जनता हेच माझे दैवत’ मानणारे व त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारे नेते म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर आहेत, असे म्हणण्याचे कारणही तसेच खास आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी माळशिरस या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एवढ्या मोठ्या सभेच्या व्यासपीठावर बसण्यासाठी मान्यवर आतुर झालेले असतात. मात्र, समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावर न बसता सहकारी नगरसेवक व इतर पदाधिकार्‍यांच्या बरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे व्यासपीठासमोर बसूनच सभेला हजेरी लावली.

‘सामान्य जनतेसोबत सामान्यपणे वागणारा नेता’ म्हणून समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांची ख्याती आहे. सामान्य जीवन जगणं काय असतं, हे आज त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या कृतीमुळे मोठा मतदारवर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे.

वास्तविक पाहता समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचा फलटण शहराबरोबर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. माढा मतदारसंघासहीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर मोठ्या खुबीने हाताळत आहेत. त्यांचा जनसंपर्क व प्रचाराची आघाडी बघता खासदार रणजितसिंह यांना मोठे मताधिक्य मिळेल, असे बोलले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!