खटाव येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । खटाव । खटाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इ. 8 वी ते पदवी , पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. मोफत भोजन व निवास तसेच शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदी करिता रोख रक्कम दिली आहे.

तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनाथ व दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांनी गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, सातारा येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!